जीवन रहस्यांच्या संशोधनाच्या श्रृंखलेचा श्रीगणेशा !
- प्रवीण मो. जोशी
जगण्याचा अभ्यास
जगण्याच्या धुंदीमध्ये जीवनाला सहायक असं आपल्या स्वतःजवळ नेमकं काय आहे, ते तपासण्याचा आपल्याला वेळ नाही, उसंत नाही आणि ईच्छाही नाही. फसव्या भावना, वेडे भयगंड, संघर्ष पोसणारा वेडेपणा यांनी संपूर्ण पिढीला हतबल करणारं एक क्रुर अमानवी यंत्रच कार्यरत केले आहे. कपटनीती, गलिच्छ फसवेगिरी आणि मादकतेचं विष आज वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात असंतुलन वाढवित आहे !
जीवन समस्यांच्या निश्चित स्वरूपाचे आकलन करुन पून्हा प्रेमपूर्ण आणि दयाशील जीवनाचा आविष्कार करु या ! खरा बलशालीपणाचा, जीवनदायी गतिमानतेचा, जीवनशास्त्राचा, शान्ततेच्या संदेशाचा, प्रेमाच्या आवाहनाचा पुन्हा नव्याने शोध घेवू या !
स्वतःबद्दलचा आणि ईतरांबद्दलचाही आपण राग वा द्वेष, भयगंड वा विशेष प्रेम सोडून केवळ संशोधन आणि आकलनाविषयीच्या स्वच्छ आणि साध्या वृत्तीने जगण्याचा अभ्यास करु या !
महान जीवनाचे सह-अभ्यासक
मी कुणाचाच गुरु नाही आणि कुणी माझा शिष्यही नाही ! आपण सर्व महान जीवनाचे बंधू भावनेने संशोधन करणारे सह-अभ्यासक आहोत.
शास्त्रोक्त प्रयोगांची श्रृंखला
जीवनाच्या ज्वलंत प्रश्नांची ह्रुदय पिळवटून चर्चा करण्यापेक्षा, सर्वंकष संशोधनवृत्तीनी ह्या प्रश्नांची ऊत्तरं शोधण्याचा आणि निश्चित ऊत्तराप्रत येण्याच्या प्रयत्नात शास्त्रोक्त प्रयोगांच्या योजनांची श्रृंखलाच कार्यरत केली पाहिजे !
ह्या आधी आपल्याला एक गोष्ट निखळ गृहीत धरावी लागणार आहे आणि ती ही की, जीवनाच्या ज्वलंत प्रश्नांवर अगदी शास्त्रोक्त महान ऊत्तर आहे आणि म्हणुनच ते यशस्वी प्रयत्नांनी सापडू शकते.
प्रयोगांतून ह्या गोष्टीची सत्यता पटताच आपल्यातला प्रत्येक जण स्वयंप्रेरणेनीच ह्या शास्त्रोक्त महान ऊत्तराचा स्वीकार करुन त्याचेच आचरण करेल.
सर्व प्रश्नांची प्रयोगातून मीमांसा
आदिवासी संघजीवनापासून जातीप्रधान जीवनपध्दती पर्यंत राष्ट्रिय आकांक्षापूर्तीपासून ते आंतरराष्ट्रिय तणावापर्यंत सर्व शक्तिसंघटना आणि त्यांची असंतुलने यांसह त्या संघटनांच्या गुंतागुंतीच्या आणि गरजांच्या प्रकार वैचित्र्याच्या दृष्टिने सर्व प्रश्नांची प्रयोगातून मीमांसा केली पाहिजे.
जीवन रहस्यांच्या संशोधनाच्या खेळाचे तरुणाईस आवाहन
कदाचित आपण यशस्वी होऊ, कदाचित होणारही नाही. मला आशा आहे की, तुम्हीही माझ्याबरोबर हा जीवनोपयोगी जुगार अत्यंत साहसीपणे खेळाल!
हा जीवन रहस्यांच्या संशोधनाचा खेळ खेळण्यासाठीच हे तरुणाईस आवाहन !
ह्यासाठीच मोकळ्या मनानी, पूर्वग्रहदुषित न होता, कुठल्याही श्रध्देचा लवलेशही न आणता, ह्या जीवन रहस्यांच्या संशोधनाच्या प्रवेशद्वारापर्यंत कशाचीही अपेक्षा न करता, कोणतीही आशा न बाळगता या.
कुणावरही श्रध्दा ठेवण्याच्या फंदात पडण्यापेक्षा संशोधक साधक म्हणूनच जीवनातील गूढ सत्याचा अभ्यास करा !
जीवन आहे तसे
विचार करण्याची योग्य जीवनोपयोगी पध्दत कोणती आहे ? जीवनोपयोगी योग्य दृष्टिकोण कोणता आहे ? आणि जीवनसमस्यांना यशस्वीरीतीनी सामोरे जाणयाची योग्य पध्दत कोणती आहे ? ह्यांविषयींचे ऊत्तर ह्या प्रयोगातूनच शोधायचे आहेत !
आपले जीवन आहे तसे स्वीकारुन त्याची सूक्ष्म निरिक्षणे नोंदवली पाहिजेत. जीवन आहे तसे हेच आपल्या संशोधनाचा आणि अभ्यासाचा विषय आहे.
अतिमानवी अनासक्तीनेच जीवनाच्या स्वरूपाचे आकलन
स्वतःच्या जीवनाबद्दल भावनिक आसक्ती दाखवली तर आपल्या स्वतःमध्ये किती तरी फसवी जीवनमूल्ये निर्माण होतात, संपूर्ण जीवनाबद्दलचा विचारच अंधूक आणि विकृत होतो. म्हणूनच, अतिमानवी अनासक्तीनीच वेड लावणारे अनूदात्त जीवनसंघर्षाच्या गूढ रहस्याचे सखोल, संपूर्ण संशोधन आणि अभ्यासानेच आकलन करायचे आहे !
आपल्या जीवनावस्थेच्या निरनिराळ्या पातळ्यांवर उपलब्ध असलेल्या जीवनाचे स्वरूप आणि त्याची कार्ये शोधणे आणि जीवनाचे सर्वसामान्य रूप समजून घ्यायचे आहे !
No comments:
Post a Comment